पटणा : बहार निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार प्रत्यक्ष निकालातही एनडीएला प्रचंड मोठे यश मिळताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलापासून भाजपा आणि जेडीयू यांच्या युतीने आघाडी घेतली आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएला बहुमत मिळत आहे. त्यासोबतच कलांमध्ये तेजस्वी यादव यांची आरजेडी तिसऱ्या नंबरवर फेकल्याचे दिसून येते. मतमोजणीच्या निकालात जेडीयू आणि भाजपा यांच्यात मोठा भाऊ कोण यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
बिहारच्या एकूण 243 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. त्यात बहुमतासाठी 122 जागांची आवश्यकता आहे. त्यात 10.30 च्या सुमारास जेडीयू 80 आणि भाजपा 78 जागांवर आघाडीवर आहे. तर आरजेडी 40 जागा, काँग्रेस 7 जागांवर आघाडीचे असल्याचे दिसून येते. एनडीएमध्ये चिराग पासवान यांच्या एलजेपीला 22 जागांची आघाडी मिळाल्याचे दिसते. बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वात भाजपाने एनडीए म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र मुख्यमंत्रिपदावरून निवडणुकीच्या प्रचारात सावध भूमिका घेत होते. आता निकालांमध्ये जेडीयू आणि भाजपा यांच्यातच काटे की टक्कर पाहायला मिळते. त्यामुळे एनडीएत बिहारमध्ये मोठा भाऊ कोण याची स्पर्धा जेडीयू आणि भाजपात सुरू झाली आहे.
बिहारमध्ये सध्या एनडीएने 185 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एनडीए सत्तेत येणार हे स्पष्ट झाले आहे. तर आरजेडी काँग्रेस आघाडीला 50-60 जागा मिळण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्येही एनडीए पुन्हा सत्तेत येईल असे अंदाज वर्तवले होते. त्यात प्रामुख्याने महिला आणि ओबीसी वर्गातून एनडीएला मोठी साथ मिळाल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी बिहारमध्ये एनडीएचा मोठा विजय होईल अशी भविष्यवाणी केली आहे. बिहारमधील निकालाचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. त्यात एनडीएला विजयी आघाडी मिळाल्याने भाजपा आणि जेडीयू यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या जल्लोषाचं वातावरण आहे. भाजपा, जेडीयू यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांकडून मिठाई वाटप करत फटाकेही फोडले जात आहेत.
दरम्यान, गेल्या निवडणुकीत किंगमेकर असलेले नितीश कुमार आता थेट बिहारचे किंग होणार असल्याचे चित्र आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये नितीश कुमारांच्या ने 80 जागांवर आघाडी घेतली आहे. गेल्या निवडणुकीत नितीश यांच्या पक्षाला केवळ 43 जागा होत्या. त्यामुळे ते किंगमेकरच्या भूमिकेत होते. पण यावेळी त्यांनी जोरदार मुसंडी मारून आपणच बिहारच्या राजकारणाचे किंग असल्याचे दाखवून दिले आहे.
तेजस्वी यादव पिछाडीवर
बिहारमध्ये धक्कादायक बाब म्हणजे तेजस्वी यादव यांच्यासाठी राघोपूरची लढत चुरशीची ठरू लागली आहे. तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघात पाचव्या फेरीत केवळ 105 मतांनी पिछाडीवर गेले आहेत. बिहारचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासाठी राघोपूरची लढत चुरशीची ठरली आहे. पाचव्या फेरीअखेर त्यांना भाजपचे उमेदवार सतीश कुमार यांच्याकडून केवळ 105 मतांनी पिछाडीवर राहावे लागले आहे. ही अत्यंत कमी मतांची तफावत पाहता, राघोपूरमध्ये निकालासाठी मतदारांना आणि राजकीय निरीक्षकांना शेवटपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. महाआघाडीसाठी हा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे.
चिराग पासवान यांची हनुमान उडी !!
या आघाडीच्या विजयात सर्वाधिक चर्चा चिराग पासवान यांची होत आहे. मागील निवडणुकीत फक्त एक जागा जिंकलेल्या लोक जनशक्ति पार्टी (रामविलास) ने यंदा 29 पैकी 22 जागांवर आघाडी घेतल्याने चिराग यांचा ङ्गस्ट्राइक रेटफ आणि राजकीय वजन दोन्ही प्रचंड वाढले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, चिराग यांनी 100% स्ट्राइक रेटचा दावा सातत्याने केला होता. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, त्यांचा दावा अंशतः खरा ठरताना दिसतोय. ने त्यांना 29 जागा दिल्या आणि त्यापैकी बहुतांश जागांवर आघाडी मिळवून, त्यांनी विश्वास खरा करुन दाखवला. यावरुनच 2020 मधील अपयशानंतर 2024-25 मध्ये चिराग यांचे पुनरुत्थान झाल्याचे स्पष्ट दिसते. मध्ये त्यांचे महत्त्व तर वाढलेच, शिवाय या निकालांमुळे बिहारच्या पुढील राजकीय समीकरणांत त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते.
जनसुराजचा प्रयोग सपशेल अपयशी
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाच्या कामगिरीकडेही अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या पीकेंना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षाला केवळ 2-5 जागा मिळताना दिसत आहेत.
निवडणुकीपूर्वी प्रशांत किशोरनितीश कुमारांवर टीका करताना मोठमोठे दावे केले होते. जेडीयूला 25 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. जनसुराज पक्षाने ग्रामीण भागाचे प्रश्न, बेरोजगारी, शिक्षण-आरोग्य यांसारख्या विषयांवर भक्कम मोहिम उभारली होती. त्यामुळे जनतेत नवीन पर्यायाची चर्चा निर्माण करण्यात हा पक्ष काही प्रमाणात यशस्वी झाला होता.